जळगाव ( प्रतिनिधी ) – पांडे चौक आणि रिंग रोड परिसरात पायी जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातून मोबाईल हिसकावणाऱ्या तिघांपैकी दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांकडून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत केले असून दोघांना जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अक्षय मुकेश अटवाल आणि अक्षय आनंदा जावळे ( दोघे रा. शनीपेठ ) अशी अटक केलेल्याची नावे आहेत .जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्हा पेठ पोलीसात दाखल मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या . त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार विजय पाटील, युनूस शेख, पोहेकॉ जयंत चौधरी, संदीप साळवे, पो.ना. विजय पाटील, पो.ना. किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, अविनाश देवरे, पंकज शिंदे, मुरलीधर बारी यांनी शनीपेठ हद्दीत संशयित आरोपी अक्षय अटवाल आणि अक्षय जावळे यांना राहत्या घरातून अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे मोबाईल हस्तगत केले दोघांसह त्यांचा मित्र रोहन निदाने ( रा. शनिपेठ ) यांनी मिळून एक मोबाईल पांडे चौकातून तर दुसरा रिंग रोडवरून पायी जाणाऱ्या व्यक्तींच्या हातातून हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली. दोघांना पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.







