फैजपूर (प्रतिनिधी) – येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या तिसऱ्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन जळगाव मुख्य शाखेचे शाखा व्यवस्थापक भूषण रंगारी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी पंकजा तिमांडे जळगाव, फैजपूर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक संजय रंगवाला, नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, प्रकाश नेमाडे, संदीप चौधरी सर, शशी चौधरी, एल. जे. बोंडे, मिलिंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात श्री. रंगारी यांनी स्टेट बँकेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देऊन नागरिकांनी यांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन केले. सीएसपी मार्गदर्शक पंकज तिमांडे यांनीही माहिती देऊन स्टेट बँकेच्या वाढत्या व्यवहारानुसार व ग्राहकांच्या सोई सुविधेसाठी येथील सरदार वल्लभभाई पटेल या व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्यावरील बीएसएनएल ऑफिस शेजारी राजेश इंगळे व उज्वला इंगळे यांच्या व्हरायटी फोटो स्टुडिओ येथील ग्राहक सेवा केंद्राचा जनतेने लाभ घ्यावा असे सांगितले. फैजपूर शाखेचे व्यवस्थापक संजय रंगवाला यांनी या ग्राहक सेवा केंद्रास सर्वतोपरी सहकार्य करून व्यवहार वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमाकांत पाटील तर आभार राजेश इंगळे यांनी मानले.