मुक्ताईनगर येथील घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत ५ लाख रुपयांचा भरणा करण्यासाठी आलेल्या बचत गटाच्या एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चुना लावत त्यातील अडीच लाख रुपये एकाने लांबविल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर दरम्यान सदर घटना घडली आहे.
मुक्ताईनगर येथील बोदवड रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या एका फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांतर्फे बँकेत भरणा करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन काउंटरवर उभे असताना काउंटरवरूनच ५०० रुपयांच्या पाच नोटांचे बंडल एकाने काउंटरवरून लांबविण्या ची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान या संदर्भात सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध असल्याचे समजते. दरम्यान संबंधित फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठले दुपारी सुमारे अडीच ते तीन वाजेपासून संबंधित फायनान्स कंपनीचे कर्मचारी पोलीस स्थानकात फिर्याद नोंदविण्यासाठी गेले असून रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती.