विश्व हिंदू परिषद ,बजरंग दलातर्फे विभाग नियंत्रकांना निवेदन
जळगाव ( प्रतिनिधी ) ;- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यातर्फे चालविण्यात येत असलेल्या एसटी बसेसवर सध्या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेले विठ्ठल देवाची प्रतिमा लावण्यात येत आहे. आज ७ रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे विभागीय नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, एसटी बसमध्ये प्रवासी द्वारा तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्यात येणे, वांती करणे इत्यादी प्रकार करण्यात येत असते तसेच एस.टी बस ही प्रवासादरम्यान अनेक मार्गांनी जात असते त्यामुळे एसटी बस ही धुळीने , चिखला द्वारा खराब होत असते यामुळे नकळत एसटी बसवर लावण्यात आलेले विठ्ठल देवाच्या प्रतिमा ची विटंबना होत आहे.
तरी महाराष्ट्र राज्याच्या आराध्य दैवत असलेले पांडुरंग / विठ्ठलाची छायाचित्र प्रतिमा तथा देवतांच्या , महापुरुषांच्या प्रतिमा एसटी बसेस वरून काढण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
तरी याप्रसंगी वि.हि.प. प्रांत धर्म प्रसार उपाध्यक्ष धनंजय तिवारी, वि.हि.प. जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, वि.हि.प. जिल्हा धर्माचार्य संपर्कप्रमुख ह.भ.प. योगेश महाराज जळगांवकर, बजरंग दल जळगांव जिल्हा संयोजक राजेंद्र नन्नवरे, वि.हि.प. जिल्हा प्रचार प्रसिध्दी प्रमुख महेश अंबिकार, वि.हि.प. जिल्हा सहसेवा प्रमुख दिपक दाभाडे, वि.हि.प. जिल्हा सदस्य हरिष कोल्हे, वि.हि.प. जळगांव महानगर मंत्री मनोज बाविस्कर, बजरंग दल महानगर संयोजक समाधान पाटील, वि.हि.प. प्रखंड मंत्री जयंत शिंदे, बजरंगदल प्रखंड संयोजक पवन शिंपी, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.