अमळनेर- येथील बीएसएनएल कार्यालयातील अधीक्षक भास्कर रामचंद्र बोरसे हे दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी स्वेच्छा निवृत्त झाल्याने त्यांचा निरोप समारंभ नुकताच सानेगुरुजी हायस्कूल येथे पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील तर प्रमुख उपस्थिती आमदार अनिल भाईदास पाटील यांची होती. बोरसे हे बीएसएनएल युनियनचे जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या पाच वर्षापासून कार्यरत होते त्यांनी बीएसएनएल मध्ये प्रदीर्घ 37 वर्ष सेवा दिली,यामाध्यमातून उत्तम जनसंपर्क त्यांचा निर्माण झाला होता,त्यांचा सुपुत्र,दोन्ही मुली,जावई आणि सून उच्चशिक्षित असून पारिवारिक जबाबदारी काळजीने पार पाडल्यानंतर बीएसएनएल धोरणानुसार त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.निरोप समारंभात नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील या देखील उपस्थित होत्या.त्यांच्या सेवेबद्दल पाटील माजी आमदार कृषिभूषण पाटील,आमदार अनिल पाटील,आमदार श्रीमती स्मिता वाघ उद्योगपती विनोद भैय्या पाटील, माजी आमदार डॉ बी एस पाटील,महाप्रबंधक एन डी बर्डे,युनियनचे जिल्हा सचिव निलेश काळे आदींनी बोरसे यांचे कार्य व सेवेबद्दल मनोगतातून कौतुक केले, तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी नातेवाईक तसेच गडखांब भागातील ग्रामस्थ व बीएसएनएल कर्मचारी यावेळी उपस्थित होते.