नवी दिल्ली ;-कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता ही घोषणा केली. यामुळे देशभरातील रेल्वे, विमान आणि बससेवा बंद झाली आहे. मोदींच्या घोषणेनंतर रेल्वे प्रशासनाने देखील मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर सेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी वाहतुक बंद असली तरी मालगाड्या सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता देशाला संबोधित केले. पुढील 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन असणार आहे, असे मोदींनी स्पष्ट केले. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले. मोदींच्या घोषणेनंतर रेल्वेने देखील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर सेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी रेल्वेने 31 मार्च पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती.