नवी दिल्ली : देशात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 89 नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत. देशभरात रुग्णांची संख्या 300 च्या पार गेली आहे. कोरोनाबाधित रुग्ण देशातून सर्वाधिक महाराष्ट्रातले आहे. आतापर्यंत 64 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून बाकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत देशातील 22 राज्यातील नागरिक कोरोनामुळे बाधित झाले आहेत. गेल्या 24 तासात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि तेलंगणामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर इतर राज्यांतही रुग्णांची संख्या वाढत आहे.
राज्यनिहाय आकडेवारी
आंध्र प्रदेशात -3
छत्तीसगड – 1
दिल्लीत – 26
गुजरातमध्ये – 13
हरियाणामध्ये – 20
हिमाचल प्रदेशात – 2
कर्नाटकात – 18
केरळमध्ये – 40
मध्य प्रदेशात – 4
महाराष्ट्रात – 64
ओडिशामध्ये -2
पुडुचेरी -1
पंजाब – 6
राजस्थान -23
तमिळनाडू -3
तेलंगणा – 21
चंडीगड – 5
लडाख -13
उत्तर प्रदेश – 4
उत्तराखंड – 4
पश्चिम बंगाल -3 रुग्ण आढळले आहेत. यातील 28 नागरिक कोरोना व्हायरसपासून ठीक झाले आहेत.