डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबमध्ये केरळ, आसाममधील तज्ञांची टिम
जळगाव – जिल्हावासियांना विदेशात जाण्यासाठी सद्यस्थीतीला आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट असणे अनिवार्य केले आहे, कारण ह्या लॅब एनएबीएल मानांकित असतात.खान्देशात डॉ उल्हास पाटील वैद्यकिय आरटीपीसीआर लॅब ही एकमेव मानांकित असून विदेशात जाणर्यांनी या लॅब कडे धाव घेतली आहे. अशाच व्यक्तीसाठी मदतीला धावून आला तो भरत…. दिवस व रात्र फोन येईल तेथे जाऊन त्या व्यक्तीचे स्वॅब घेणे ते लॅब मध्ये पोहचवणे, टेक्नीशियनला त्या स्वॅबचे महत्व पटवून वेळेचे बंधन पाळण्यास सांगून दूसरा स्वॅब घ्यायला पळणे हा त्याचा दिवसरात्रीचा क्रम झाला आहे. केव्हाही फोन आला की भरत हसतखेळत तुम्ही टेन्शन घेऊ नका मी अर्ध्यातासात पोहचतो व तुमचा रिपोर्टही वेळेच्या आत मिळेल असे आश्वासन देऊन स्वॅब कलेक्शन करण्यात दिवस-रात्र मग्न असतो. यातूनच त्याला आताशी आतंरराष्ट्रीय स्वॅब कलेक्शन दूत असेही लोक बोलू लागले आहे.
भारतीय विमानतळावर केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच खान्देशातील डॉ.उल्हास पाटील आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट ग्राह्य धरला जात आहे, त्यामुळे विदेशात जाणार्यांकरीता येथील आरटीपीसीआर लॅब सोयीची ठरत आहे, तब्बल ७२ तासांनी आरटीपीसीआरचा रिपोर्ट मिळत असल्याने विदेशात जाणारे त्रस्त झाले असता मात्र डॉ.उल्हास पाटील आरटीपीसीआर लॅब ही अवघ्या २४ तासातच रिपोर्ट देत आहे असे समजताच भरत पाटील ह्या स्वॅब कलेक्शन करणार्या दूताला सतत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला जात आहे, तो देखील न कंटाळता आलेल्या कॉलला प्रतिसाद देवून स्वॅब कलेक्शनसाठी सदर स्थळी पोहोचतो आणि २४ तासाच्या आतच सदर व्यक्तीला रिपोर्टही देतो यामुळे डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा भरत हा इंटरनॅशनल स्वॅब कलेक्शन दूत ठरत आहे.
केरळचे डॉ.प्रशांत कुमार गुड्ेटी तर
आसामचे बिट्टोपन दास यांचे आगमन
खान्देशातील सुप्रसिद्ध अशा डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एनएबीएल मानांकित आरटीपीसीआर लॅब जिल्हावासियांसाठी २४ तास सेवेत आहे. तब्बल २५ जणांचा स्टाफ हा २४ तास वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कार्यरत आहे. याकरीता आरटीपीसीआर लॅब प्रमुख डॉ.कैलास वाघ, डॉ.विपीन तोडसे, डॉ.शिरीश गोंदाणे, विठ्ठल शिंदे, डॉ.हेमंत पाटील, अमोल चौधरी, प्रांजल पाटील, आफताब दानिश मोहम्मद आसिफ, पठाण नयीम हसन खान यांच्यासह लॅबमध्ये खास केरळहून प्रशांतकुमार गुड्ेटी तर आसामहून बिट्टोपन दास ह्यांना पाचारण करण्यात आले आहे. ह्या सर्वांच्या अथक प्रयत्नाने २४ तासातच आरटीपीसीआर रिपोर्ट दिला जात आहे.