जळगाव – डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात सात वर्षीय बालकावर यशस्विरित्या उपचार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच हे उपचार एका बालकावर करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, 21 जानेवारी 2021 रोजी रुग्णालयातील बालरोग विभागात आठ वर्षीय दामोदर विठ्ठल पवार या बालकास भरती करण्यात आले होते. अंत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थीती व अत्यवस्थ बाळ अशा परिस्थीतीत बाळ व नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. अत्यवस्थ असलेल्या या बाळाची लघवी थांबलेली व पोटात दुखणे चालु होते. तपासणीअंती निदान झाले की, बाळाच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर दोन्ही किडणीमध्ये खुप मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग झाला होता. सर्वप्रथम अत्यवस्थ असलेल्या या बाळाची जनरल कंडिशन ठिक करण्यात आली. नंतर डायलेसिसचा निर्णय घेण्यात आला. 4, 6 व 8 फेब्रुवारी रोजी तीन वेळा या बालकावर डायलेसिस मशीनद्वारे डायलेसिस करण्यात आले. बाळाची प्रकृती स्थिर असून त्यात हळूहळू सुधारणा होत आहे.
सदरहू बालकावर बालरोग विभागातील विभागप्रमुख डॉ.उमाकांत अनेकर, डॉ.विनय पाटील, डॉ.विजय गरकल, डॉ.सुरुची शुक्ला, डॉ.भंगाळे, डॉ.भोळे आदिंनी उपचार केले. तसेच भुलरोग तज्ञ विभागातील डॉ.शितल डहाके, डॉ.दिनेश लालवाणी यांनी बाळाला डायलेसिससाठी आवश्यक असलेली मोठी ट्यूब टाकण्यास मदत केली. याचबरोबर कुठलीही ओळख नसतांना औरंगाबाद येथील ऑर्किड किडनी हॉस्पीटलचे संचालक डॉ.पंकज भंसाली यांनी फोनवरुन संपर्क साधत वेळोवेळी मदत केली. याचबरोबर जळगाव येथील किडनी विकार तज्ञ डॉ.अमित भंगाळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. तर गोदावरी रुग्णालयाचे किडनी विकार तज्ञ डॉ.अभय जोशी आणि डायलेसिस विभागातील रवी बोरसे, निकिता सुपारी यांनी डायलेसिसकरिता मेहनत घेतली.

सदरहू बाळ आमच्याकडे आले तेव्हा अत्यवस्थ व शॉकमध्ये होते. तसेच दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्या सोबत येणाऱ्या अडचणींना सामोरे जात होते. परंतु शिस्तबद्ध नियोजन करुण उपचार केले. त्यानंतर बाळाची तब्येत ठिक करुन डायलेसिस करण्यात आले. यासाठी एका उत्कृष्ठ टिमवर्कची गरज होती जी गोदावरी रुग्णालयात उपलब्ध आहे. बेशुद्धीत असलेले आणि डायलेसिस चालू असलेल्या बाळाचा जीव वाचू शकेल की नाही हा प्रश्न असतांना आज बाळ हसून बोलत आहे याचे खुप मोठे समाधान वाटते.







