जळगांव ;– जिल्हयामध्ये कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून कोव्हिड-19 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या देखील मोठया प्रमाणात वाढलेली आहे. या पार्श्वभुमीवर क्षेत्रीय स्तरावरुन माहिती घेतली असता, अशी बाब निदर्शनास आली आहे की जळगांव जिल्हयामध्ये नागरीक / व्यक्तींना ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणे
पार्श्वभुमीवर घरोघरी जाऊन सर्वक्षण केले जात असून सदर सर्वेक्षणादरम्यान देखील नागरीक सविस्तर माहिती देत नाहीत. याअनुषंगाने सर्वेक्षणासाठी येणा-या कर्मचा-यांना कुटूंबातील सर्व व्यक्तींची , त्यांना आढळून येणा-या लक्षणांची , घरातील 65 वर्षापेक्षा जास्त वय असणा-या सदस्यांना असलेल्या इतर कोणत्याही आजाराची माहिती, 10 वर्षा पेक्षा लहान बालकांची , गरोदर महिलांची सविस्तर माहिती पुरविण्यात यावी. तसेच कोणत्याही प्रकारचे लक्षणे उदा. ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे इत्यादी आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या सरकारी / खाजगी रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मा डॉ अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी जळगांव यांनी केलेले आहे.







