चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील बिलाखेड येथे उघडकीस आला असून यामुळे खळबळ उडाली आहे . याबाबत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , तालुक्यातील बिलाखेड येथील रोहीत संजय पाटील (वय-१७) व शुभम बापू लोखंडे (वय-१७) रा. बिलाखेड ता. चाळीसगाव हे दोघेही २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २ ते ५ वाजताच्या सुमारास राहत्या घरातून दुचाकीवरून (क्र. एम.एच.१९ बीबी ५९८८) कुठेतरी निघून गेले आहेत. त्यावर घरच्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता दोघेही मिळून आले नाही. म्हणून त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहेत. संजय वामन पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.