अंमळनेर ( प्रतिनिधी ) अमळनेर तालुक्यातील राष्ट्रीय विकलांग पार्टीचे कार्यकर्त्यांनी वर्धापन दिन साजरा केला. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष केके दीक्षित यांचाही वाढदिवस साजरा केला. या तालुक्यातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते या कोरोना महामारी तही वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आले होते त्यावेळेस जिल्हाध्यक्ष दीपक सुरेश पाटील यांनी सांगितले की, आपण सर्व एकजुटीने राहून आपल्या समस्या प्रशासनापर्यंत कळल्या पाहिजेत. तसेच तालुकाध्यक्ष बिरजू छगन चौधरी यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीचे महत्त्व सांगितले यावेळेस शहराध्यक्ष अमोल मधुकर पाटील, शहर उपाध्यक्ष करीम हुसेन बागवान, रवींद्र एकनाथ साळुंखे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.