पारोळा : तालुक्यातील बोळे येथील २६ वर्षीय तरुण कर्जबाजारी शेतकऱ्याने आज दि. १४ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १४ घडली.
पारोळा तालुक्यातील बोळे येथील नितीन राजेंद्र कोळी (वय २६) हा शेतातून घरी आला तेव्हापासून तो दिसत नसल्याने आई त्याचा शोध घेत असतांना पत्र्याच्या घरात लोखंडी अँगलला सुती दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे दिसून आले.
नितीन कोळी याचा मोठा भाऊ प्रदीप हा सेलवास येथे नोकरीला आहे. म्हणून हाच शेती कसत होता. त्यावर सोसायटीचे व इतर कर्ज होते. त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. या घटनेबाबत सुकलाल शंकर कोळी यांनी पारोळा पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चव्हाण हे करीत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
———————-