रूग्णांना टाळ्या वाजवत रूग्णालयातून मिळाली सुटी

जळगाव – येथील शासनाने अधिग्रहीत केलेल्या डॉ. उल्हास पाटील कोव्हीड केअर सेंटरमध्ये करण्यात आलेल्या यशस्वी उपचारामुळे १८ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. या सर्व रूग्णांना रूग्णालयातुन सुटी देण्यात आली असुन टाळ्या वाजवत त्यांना आनंदाने निरोप देण्यात आला.
कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खाजगी रूग्णालये अधिग्रहीत केले आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील ४५० खाटा कोरोनासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या रूग्णालयात दाखल होणार्या कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासोबत त्यांची प्रतिकार शक्ती आणि श्वसनक्रिया सुरळीत राहण्यासाठी फिजीओथेरेपीची उपचार पध्दती फायदेशीर ठरत आहे. याचबरोबर चहा,नास्ता व जेवणाची उत्तम सोय रूग्णालयामार्फत ठेवली जात आहे.
स्वच्छतेवर अधिक भर
कोरोना बाधित आणि संशयित अशा दोन्ही वार्डातील स्वच्छतेवर देखिल रूग्णालयाकडुन अधिक भर दिला जात आहे. यामूळे घरीच उपचार मिळत असल्याची भावना रूग्णांमध्ये निर्माण होत असुन त्यांचा आत्मविश्वास देखिल वाढत आहे. कोविड सेंटरचे सदिग्ध्द, पॉझीटीव्ह व अत्यावस्थ रूग्णांसाठी वेगवेगळी सुविधा रूग्णालयाने उपलब्ध करून दिलेली आहे. भव्य प्रशस्त वार्ड अत्याधुनि अतिदक्षता विभाग, तसेच तज्ञ डॉक्टरांची टीमबरोबर एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध असल्याने रूग्णांची व नातेवाईकांची धावपळ कमी होउन उपचारास गती मिळाल्याने रूग्ण लवकर बरे होण्यास मदत होते आहे. कोव्हीड सेंटरमध्ये डॉ. चंद्रया कांते, डॉ पाराजी बाचेवार, डॉ. सी सारंग यांचे सोबत भुलरोग विभागचे सर्व तज्ञ, फिजीओरेथेरपीचे तज्ञ, नर्सिग सेवा परिश्रम घेत आहे.
१८ जण आनंदाने स्वगृही परतले
डॉ. उल्हास पाटील कोव्हीड रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांपैकी १८ रूग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना रूग्णालयातुन सुटी देण्यात आली असुन त्यांच्या चेहर्यावर आनंदाचे हास्य दिसुन आले. हे सारे रूग्ण आनंदाने पुर्णत: बरे होऊन स्वगृही परतले.







