जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या एनएबीएल मानांकित मॉलिक्युलर डायग्नोस्टीक लॅबच्या माध्यमातून कोरोनाच्या तब्बल ५० हजार तपासण्या यशस्वीरित्या करण्यात आल्या. डॉ. पाटील रूग्णालयाच्या लॅबमध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांचे कोरोनाचे अचुक निदान झाल्याने रूग्णांवर यशस्वी उपचार झाले अन् हजारो रूग्ण कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतले.
कोरोना या आजाराच्या नियंत्रणासाठी टेस्टींगवर म्हणजेेच तपासण्यांवर भर देण्याच्या सुचना राज्य शासनामार्फत देण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना तपासणीसाठी अनेक मर्यादा येत होत्या. मात्र दुसर्या टप्प्यात कोरोनाच्या उपचारासोबत तपासणीसाठीही डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाने आपले मोलाचे योगदान दिले. अवघ्या काही दिवसातच एनएबीएलचे निकष पूर्ण करून मॉलिक्युलर डायग्नोस्टीक लॅब उभारण्यात आली. या लॅबमुळे जिल्ह्यातील कोरोनाचे स्वॅब हे जिल्ह्यातच तपासले जाऊ लागले. नागरिकांना कोरोना सदृश्य लक्षणे जाणवणार्यांची संख्या मधल्या काळात मोठ्या प्रमाणावर होती. आरोग्य यंत्रणेवर तपासण्यांचा मोठा ताण होता. अशा परिस्थीतीत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या मॉलिक्युलर डायग्नोस्टीक लॅबने महत्वाची कामगिरी बजावली. दिवसाला ८०० ते १००० स्वॅब तपासणी करण्यात येऊन कोविडचे निदान केले जात होते. अवघ्या काहि दिवसातच या लॅबच्या माध्यमातून तब्बल ५० हजार कोविडचे स्वॅब तपासण्यात आले. तपासलेल्या या स्वॅबचे अचूक निदान करण्यात आल्याने रूग्णांवर उपचार करणे शक्य झाले.
२४ तासात मिळताय रिपोर्ट
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या एनएबीएल मानांकित मॉलिक्युलर डायग्नोस्टीक लॅबच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्वॅबचे रिपोर्ट येण्यासाठी रूग्णांना अधिक प्रतिक्षा करावी लागली नाही. अवघ्या २४ तासात कोरोनाचा रिपोर्ट रूग्णांना उपलब्ध झाल्याने तातडीने उपचाराची सुविधाही त्यांना उपलब्ध झाली. खान्देशात खासगी क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वॅब तपासणी करणारी ही लॅब एकमेव आहे. कोविडचे संकट अजून टळलेले नाही. रूग्णांना लक्षणे असल्यास त्यांनी तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या एनएबीएल मानांकित मॉलिक्युलर डायग्नोस्टीक लॅबच्या माध्यमातून कोविडची चाचणी करून अचूक निदान करून घ्यावे असे आवाहन मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कैलास वाघ यांनी केले आहे.