जळगाव सायबर सेलचे आवाहन
जळगाव ( प्रतिनिधी ) ;- सोशल मीडियाद्वारे अनोळखी व्यक्ती वा महिलेशी चॅटिंग,व्हिडीओ कॉलिंग करताना सावधानी बाळगून फसवणूक टाळावी असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे.
व्हाटसप,फेसबुक, इंस्टाग्राम,डेटिंग अँप आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून पुरुषांशी मैत्री करून व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे करण्यास भाग पाडून व्हिडिओचा दुरुपयोग करून धमकीद्वारे पैशांची मागणी करण्यात येते. असे अकाऊंट बहुतांशपणे पुरुष वापरात . त्यामुळे अशा महिलांशी ओळखी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.