एका अल्पवयीन संशयितासह ३८ लाखांची रोकड ताब्यात
जळगाव ( प्रतिनिधी ) ;- तामिळनाडू राज्यातील सेलम येथे एका घरात नोकर म्हणून कामास लागलेल्या दोन आरोपींनी घरातून १९ मे रोजी ५० लाख रुपयांची रोकड चोरून फरार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सेलम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता . या गुन्ह्यातील आरोपी हा एका सहआरोपी असलेल्या अल्पवयीन आरोपीसह नवजीवन एक्सप्रेसमधून प्रवास करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून यातील अल्पवयीन आरोपीसह एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ३८ लाख रुपयांची रोकड हसगत करण्यात आली असून सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सेलम पोलीस स्टेशनचे कर्मचारी जळगावकडे रवाना झाले आहेत.
तामिळनाडू राज्यातील सेलम येथे एका घरात नोकर म्हणून कामास लागलेल्या दोन आरोपींनी घरातून १९ मे रोजी ५० लाख रुपयांची रोकड चोरून फरार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सेलम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता . या गुन्ह्यातील आरोपी हा एका सहआरोपी असलेल्या अल्पवयीन आरोपीसह नवजीवन एक्सप्रेसमधून प्रवास करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून यातील अल्पवयीन आरोपीसह एकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ३८ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सेलम पोलीस स्टेशनचे कर्मचारी जळगावकडे रवाना झाले आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , मोहनकुमार जगाथागी, देवनयागम स्टे,सेवापेट,सेलम ( तामिळनाडु ) यांचेकडे १९ रोजी सांयकाळी ७ ते दिनांक २० रोजी सांयकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरातुन कामाला असलेले नौकर यांनी जबरी चोरी करुन पन्नास लाख रुपये चोरी करुन नेले होते. त्या अनुषंगाने सेलम पोलीस स्टेशन ( तामिलनाडु ) भाग – ५ गुरन. २४८/२०२१ भादवि.क.३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील दोन आरोपी हे राजसस्थान मधील होते ते आरोपी हे राजसस्थान मध्ये गुन्हयातील मुद्देमालासह जाणार असल्याची माहिती सेलम चे पोलीस अधीक्षक यांना मिळाली होती . त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सेलम यांनी डॉ. प्रविण मुंढे पोलीस अधीक्षक जळगाव यांना माहिती कळवली होती . त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील स.फौ.अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख, प्रदीप पाटील, जयंत चौधरी , सुनिल दामोदरे,विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, मुरलीधर बारी अशांना रवाना केले होते.
सदरचे पथक हे मलकापुर ते जळगाव या दरम्यान चेत्रई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसची तपासणी करुन आरोपी मंगलराम आसुराम बिस्नोई. वय – १९ रा.खडाली ता.गुडामालाणी,जि.बाडमेर( राजस्थान ) यांचे सह एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेवुन त्यांची नवजीवन एक्सप्रेस मध्येच अधिक
चौकशी केली असता त्यांचे कडेस सेलम पोलीस स्टेशन ( तामिलनाडु ) भाग – ५ गुरन.२४८/२०२१ भादवि.क.३९२ या गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमालापैकी ३७, ९७,७८०/- रुपये मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. डॉ..प्रविण मुंढे यांचे सुचनेनुसार तामिळनाडु पोलीस राज्यातील संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आरोपीना घेण्यास निघाले आहेत.