नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) ;- प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळत आहे.
ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेड्स तोडले आहेत, तर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
किसान मजदूर संघर्ष समितीने बीबीसी पंजाबीशी बोलताना सांगितलं की ते आधी ठरलेल्या रूटवरच ट्रॅक्टर रॅली करणार आहेत. ते सांगतात की ते मध्य दिल्लीभोवतीच्या रिंग रोडवर फेरी मारून परत जातील. पण अनेक शेतकरी मध्य दिल्लीतल्या ITO परिसरात पोहोचले आहेत. तिथे पोलीस निदर्शकांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे ठिकाण इंडिया गेट, संसद भवन आणि इतर महत्त्वाच्या वास्तूंपासून अवघ्या एक-दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे.








