जळगाव ( प्रतिनिधी ) ;- संयुक्त किसान मोर्चाने २६ मे हा लोकशाहीलाच काळा दिवस म्हणून हाक दिली असून याच्या समर्थनार्थ आज दुपारी बांधकाम संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात येऊन घोषणाबाजी करण्यात आली. विजय पवार यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांच्या निवेदनात म्हटले आहे कि, सर्वाना मोफत कोरोना लस , सर्व बेरोजगार यांना मासिक साडेसात हजारांचे रोख अर्थ सहायय देणे, पीक हमी भावाचा कायदा करा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहे.








