कजगाव ता भडगाव ;- येथील बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक तथा साहित्यिक सुनील गायकवाड यांच्या भोंगऱ्या कथासंग्रहची दुसऱ्या आव्रुर्तीचे आज ब. ज. हिरण विद्यालयात मराठी राजभाषा दिनी प्राचार्य एम. के. पवार तथा माजी विद्यार्थी प्रतिनिधी नितीन सोनार यांच्या हस्ते सामाजिक अंतर ठेवून प्रकाशन करण्यात आले.
यावेळी हिरण विद्यालयाचे प्राचार्य एम के पवार म्हणाले की सदर कथासंग्रह विदयार्थ्यांच्या सुप्त कलागुनां करिता प्रेरणादर्शक ठरेल. सदर कलाकृती सातपुडा तें सातमाळा भूमी ची सांक्रुतिक, सामाजिक, साहित्यिक व मानवी जीवन मूल्ये जोपासनारी आहे येणाऱ्या पीढ़ी करिता मार्गदर्शक ठरेल कारण साहित्यिक हा शाळेत तैयार होत नाही. तों प्रसंगातून प्रतिभेच्या जोरावर व नवदृटि नें घडला जातो असे उदगार.प्रकाशन करते वेळी प्राचार्य एम. के. पवार यांनी विचार प्रकट केले.
चालती बोलती मानस, गांव वस्ती चे वास्तव जीवन ,गाव गाड्याच्या वेदना…. ग्रामीण संकृती, वंचित घटक, सामान्य रंजला गांजलेला माणूस ही भौगऱ्या कथासंग्रहाची वैशिष्ठ्य आहेत. असे नितीन सोनार यांनी प्रकाशनावेळी सांगितले.
तर सुनील गायकवाड यांनी सांगितले की बोलीभाषा ह्या जगायला हव्यात. जोपर्यंत ग्रामीण भागातील जाणिवा जिवंत आहेत तो पर्यत बोली भाषा ह्या ग्रामीण अस्मिता उलगुडुन दाखवतील व साहित्याच्या बोली ठरतील ते कार्य नव साहित्यिकांनी करावे. असे ही गायकवाड यावेळी म्हणाले
यावेळी एल. जे सोनवणे,एस. जी. सोमवंशी, के.सि. बारेला, एस. एम. शिंदे, डीं. व्ही पाटील, रावसाहेब पाटील प्रविण झालसे , के. जी. पाटील इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







