धरणगांव (प्रतिनिधी ) :-संयुक्त राष्ट्र स्वीडन यांच्या वतीने शाश्वत विकास ध्येय 2030व इको ट्रैनिंग सेण्टर यांच्या संयुक्त विद्यमाने भारत बांग्लादेश इंग्रजी भाषा शिक्षक व विद्यार्थी टेली कोलेबोरेशन च्या माध्यमातून वीडियो कान्फरेन्स झूम मिटींग मधून विविध विषयावर चर्चा, संवाद घडून येत आहे. .जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था DIET जळगाव व नाशिक यांनी हा प्रकल्प हाती घेतला आहे . जळगावातील 50 व एकूण 194 शिक्षकांचा सहभाग आहे. .संयुक्त राष्ट्राचा जनरल सभेनूसार 2030 पर्यंतचा आराखडा अजेंडा आहे भारतातील हर्षा चव्हाण (मुंबई),गणेश सिंह सूर्यवंशी (धरणगाव ),शेख शगुफ्ता (भडगाव ),आयेशा अख्तर व नर्गिस सुलताना (बांग्लादेश )यांचा समावेश आहे . पी आर हायस्कूल चे विध्यार्थी भूमिका सूर्यवंशी, वैशाली रावतोले ,पल्लवी सोनवणे, नीरल बडगुजर, पलक कुमट ,मयुरी अहिरे, भाग्यश्री सोनवणे, पूर्वा केले,तेजेंद्र सूर्यवंशी, अभिजित देशपांडे हे विध्यार्थी दररोज बांग्लादेश शिक्षकांच्या भावना, मनोगत जाणून घेत आहे. एसडीजीचे 17 सेशन आहे त्यामधून जगातील गरिबी, भूक, चांगले आरोग्य, चांगले शिक्षण, स्री पुरुष समानता, स्वच्छ पाणी आणि निसारन या विषया तून माहिती देत आहे .योगेश सोनवणे हे प्रकल्प प्रमुख व भरत शिरसाठ हे सहप्रमुख आहे .