जळगाव – कोरोना महामारी काळात कोविड रुग्णांसह नॉन कोविड रुग्णांनाही स्वतंत्र विभागात समर्पण भावाने उत्तम वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालय हे एकमेव ठरले आहे. या समर्पण सेवेची दखल घेत भारतीय प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयाला सन्मानित केले. हा सन्मान डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांनी स्वीकारला.
कोरोना महामारीने २०२० मध्ये जग हादरले होते. मात्र या कठीण काळात आपल्याकडे आलेल्या प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय सेवा तात्काळ मिळायला पाहिजे या हेतूने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाने उत्तम व्यवस्था केले होती. मार्च २०२० च्या शेवटी लॉकडाउन सुरु झाले. कोरोना म्हणजे काय ? कसा विषाणू आहे ? आपल्याला कोरोना झाला तर काय होणार ? त्यातच नेहमीचे डॉक्टर केवळ औषधी लिहून देत …. या अचानक आलेल्या कोरोना काळातही डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आपल्या संपूर्ण टीम सहित रुग्णां साठी सज्ज होते. जून महिन्यात शासनाने डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील ३४० बेड्स अधिग्रहित केले होते. त्यावेळी रुग्णालयाने एक स्वतंत्र इमारत कोविड साठी दिली होती.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या प्रेरणेने डॉ.केतकी आणि डॉ. वैभव पाटील यांनी कोविड कक्षाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. या दाम्पंत्याने जीवाची पर्वा न करता आलेल्या रुग्णाला स्वीकारात त्याच्यावर यशस्वी उपचार केले. कोविड कक्षात काम करणारे अन्य डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांनी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती काळजी घेत आपली सेवा दिली. याशिवाय नॉन कोविड रुग्णालयातही आलेल्या सामान्य, गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना तात्काळ उपचार देत जीवनदान देण्यात आले. कोविड काळात जळगाव जिल्हा वासियांसाठी देवालयचं ठरलेल्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा या समर्पित सेवेची दखल पालकमंत्र्यांनी घेत सन्मानित केले.








