माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांची गोदावरी अभियांत्रिकीस भेट
जळगाव — विज्ञान व तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संचार या विभागांचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. विजय नवल पाटील यांनी गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व विभागप्रमुखांसोबत ग्रामीण भागात सौरऊर्जेच्या उज्ज्वल भविष्याविषयी सखोल चर्चा केली.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी श्री विजय नवल पाटील यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. राज्य निसर्ग ऊर्जा व सौर ऊर्जा संघटना व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सौरऊर्जेवरती सौर ऊर्जेची गरज निर्मिती व उपयोजिता या विषयावरती एक दिवसीय परिषद घेण्याचे ठरविले असून या कामी गोदावरी फाउंडेशनच्या सदस्य डॉ. केतकी पाटील तसेच माजी केंद्रीय मंत्री श्री विजय नवल पाटील, सौर संघटनेचे राज्य अध्यक्ष ओम देशमुख, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय कुमार पाटील व त्यांच्या सहकारी प्राध्यापकांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये कार्यशाळा व परिषद आयोजित करण्याविषयी सखोल चर्चा झाली यावेळी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी सौर ऊर्जेचे राज्याचे व केंद्राचे धोरण तसेच सौर ऊर्जेमुळे विजेची बचत कशी होईल, सौर ऊर्जेची निर्मिती जास्तीत जास्त करून समाजामध्ये सौर ऊर्जेविषयी जनजागृती करणे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.सौरऊर्जा हे पारंपारिक ऊर्जेच्या तुलनेत अधिक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय असल्यामुळे याचा मोठा फायदा ग्रामीण भागांना होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शैक्षणिक संस्थांनी नवसंशोधन आणि तंत्रज्ञान विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.यावेळी श्री. विजय नवल पाटील यांनी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांवर एक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केले जाणार असून या परिषदेला सौर ऊर्जा मंत्री श्री अतुल सावे, पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद उपस्थित राहणार आहेत. तसेच ऊर्जा संघटनेमध्ये काम करणारे विविध प्राध्यापक यांचे लेख संकलित करून एक उपयुक्तता स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे.परिषदेमध्ये ऊर्जा तज्ञ, संशोधक आणि औद्योगिक तज्ज्ञ एकत्र येऊन सौरऊर्जा क्षेत्रातील नव्या संधींवर आणि आधुनिक तंत्रज्ञानावर चर्चा करतील. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्या शैक्षणिक उपक्रमांद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊर्जा क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी योगदान देत आहे. येणार्या काळात होणारी परिषद या क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी ज्ञानवाढीचे प्रभावी व्यासपीठ ठरेल.या बैठकीच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच प्रा. सुनील गरुड, डॉ. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), डॉ. नितीन भोळे (विभाग प्रमुख बेसिक सायन्स अँड ह्युमॅनिटीज), डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (विभाग प्रमुख आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स) प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख), प्रा. महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख) हे उपस्थित होते.