जमावाचा पोलीस स्टेशनला घेराव, रावेर तालुक्यातील निंभोरा येथील घटना
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील दोन अल्पवयीन संशयित आरोपींनी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यामुळे संतप्त तरुणांनी निंभोरा पोलीस ठाण्यात येऊन ठिय्या आंदोलन केले. संशयितांना तत्काळ अटक करावी म्हणून मागणी धरली. पोलिसांनी जमावाला शांत केले. तसेच संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.
पोस्ट व्हायरल झाल्याने निंभोरा पोलीस ठाण्यात खिर्डी, निंभोरा, वाघाडी, रेंभोटा या गावांसह परिसरातील युवक व ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात येवून घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन केलं. यावेळी आरोपीस तत्काळ अटक व गुन्हा दाखल करा अशी मागणी केली . घटनेचे गांभीर्य लक्षात फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी जमावास शांत केले. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला .
यावेळी नंदकिशोर महाजन, छोटू पाटील, भैया पाटील, विनोद पाटील, ज्ञानेश्वर महाजन, पवन चौधरी, खिर्डी बु पोलीस पाटील रितेश चौधरी, खिर्डी खुर्द पोलीस पाटील प्रदीप पाटील, विवरा खुर्द पोलीस पाटील योगेश महाजन, कांतीलाल गाढे, गुणवंत पाटील, भूषण पाटील, गफुर कोळी, प्रदीप पंजाबी महाराज, किरण महाजन, किरण नेमाडे, धीरज पाटील, किसन महाजन, अतुल पाटील, सोनू पाटील, प्रशांत पाटील, प्रसाद चौधरी, राकेश रायपूरे, नितीन पाटील, सचिन चौधरी, पवन चौधरी, यश चौधरी, पूर्वेस बोरसे, स्वप्नील गिरडे आदी उपस्थित होते. पुढील तपास फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनी गणेश धुमाळ करीत आहे. यावेळी रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, तसेच दंगल नियंत्रण पथक जळगांव, पोलीस व होमगार्ड यांनी बंदोबस्त ठेवला.