गोवा (वृत्तसंस्था ) भाजप नेत्या आणि टीक-टॉक स्टार सोनाली फोगटच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. या प्रकरणी गुरुवारी गोवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सोनालीच्या भावाच्या तक्रारीवरून टीक-टॉक स्टारचे पीए सुधीर आणि त्याचा पार्टनर सुखविंदर यांना अटक करण्यात आली आहे.
त्याचवेळी गोवा पोलिसांनी कर्लीज रेस्टॉरंटच्या मालकाचा जबाब नोंदवला आहे. सुधीर आणि सुखविंदर यांनी फोगटला या रेस्टॉरंटमध्ये नेले.
शवविच्छेदन अहवालात जखमेच्या खुणा आढळल्याने मृत्यूचे गूढ अधिकच वाढले होते. कर्लीज रेस्टॉरंटचा मालक एडविन न्युन्स याची गोवा पोलिसांनी तब्बल 6 तास चौकशी केली. सोनाली फोगट तिच्या दोन लोकांसह त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आल्याची पुष्टी हॉटेल मालकाने केल्याचे सूत्रांनी सांगितले.