जळगाव ( प्रतिनिधी ) — सोनसाखळी चोरीच्या एका घटनेचा तपास करताना २ आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून अशा ८ गुन्हयांची कबुली मिळवण्यात जळगाव पोलिसांना यश आले असल्याची माहिती आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे म्हणाले की , शहरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एखाद्या महिलेला थांबवून तिचे दागिने आणि प्रामुख्याने सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या अशीच एक घटना शहरात १३ सप्टेंबररोजी घडली होती . या चोरीचा तपास जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पथक करीत होते. या पथकातील काही पोलीस कर्मचारी चोरांच्या मागावर ४ दिवस नाशिक शहरात थांबून होते अखेरीस या पथकाने नाशिक शहरातून २ चोरांना अटक केली यापैकी १ जण नाशिकचा आणि दुसरा मालेगावचा आहे. संदीप सोनवणे आणि सतीश चौधरी अशी या आरोपींची नवे आहेत या दोन्ही चोरांनी जळगाव शहरात केलेल्या अशाच प्रकारच्या ८ गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. आता सर्व गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालाच्या रिकव्हरीचे प्रयत्न पोलीस करीत आहेत ३० ते ३४ वयोगटातील हे आरोपी आहेत , असेही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
या आरोपींनी राज्यात अन्यत्रही असे गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जळगाव पोलीस आता त्या दिशेने या आरोपीची चौकशी करीत आहेत जळगावात १३ तारखेला आणि औरंगाबादेत ६ तारखेला असा गुन्हा घडल्याने जळगाव पोलिसांनी हा मुद्दा देखील तपासात विचारात घेतला होता जळगाव शहरातील ज्या ८ गुन्ह्यांची कबुली या आरोपींनी दिली आहे. त्यात रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीलतील ७ आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४ गुन्ह्यांचा समावेश आहे . महत्वाचे म्हणजे हे आठही गुन्हे याच म्हणजे २०२१ सालात नोंदवले गेलेले आहेत . जिल्हा पेठ पोलीस ठाण्यातील गु र न ९८ / २१ , २५१/२१ , ३७५ / २१ ,३९८ /२१ आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यातील २१/२१, ७२ /२१,\१२७ /२१, १४३ /२१ या क्रमांकांनी आणि भा द वि कलम ३९२ , ३४ नुसार नोंदवलेलया ८ गुन्हयाची कबुली या आरोपींनी दिली आहे संदीप रोहिदास सोनवणे ( श्रमिकनगर , नाशिक ) आणि सतीश गोविंद चौधरी ( शरदनगर , मालेगाव ) अशी या आरोपींची नावे आहेत.







