लोकांना नग्न करून खाऊ घालायचे शेण
सोलापूर (वृत्तसंस्था) – गावठी पिस्तूलाचा तसेच धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लोकांना नग्न करणाऱ्या आणि शेण खाऊ घालणाऱ्या विकृत टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. . ही टोळी लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन विवस्त्र करीत असे, सोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डही करीत असे. एवढंच नाही तर ते व्हिडीओ आपसात शेअर देखील केले जात होते.
लोकांना शेण खाऊ घालणे, हस्तमैथून करायला लावणे या गोष्टी ही टोळी सर्रास करत असे. या टोळीने विकृतीचा कळस गाठला होता अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीमध्ये सागर कांबळे वय 22, बुद्धभूषण नागटिळक वय 26, सतीश गायकवाड वय 25, अक्षय थोरात वय 26 अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
जुना तुळजापूर नाका ते रुपभवानी मंदिर या परिसरात ही टोळी आपली विकृत कृत्ये करीत असे. अखेर जोडभावी पेठ पोलिसांनी या सर्व विकृताना अटक करून भा दं वि कलम 292, 506(2), भारतीय हत्यार कलम कायदा 3,4,25 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच गावठी पिस्तूल, धारधार शस्त्रे आणि 4 मोबाईल सह एकूण 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे.