• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“स्मिताताईंनी केंद्र सरकारची सर्व खाती एका छताखाली आणली”-  मंत्री संजय सावकारे यांचा गौरवोद्गार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 6, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
“स्मिताताईंनी केंद्र सरकारची सर्व खाती एका छताखाली आणली”-  मंत्री संजय सावकारे यांचा गौरवोद्गार

‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ प्रदर्शनाची उत्साहात सांगता

जळगाव ( प्रतिनिधी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या देश आणि राज्याच्या विकास प्रवासाचे प्रतिबिंब दाखवणारे ‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ हे भव्य प्रदर्शन जळगावातील शिवतीर्थ मैदानावर भव्यदिव्य वातावरणात पार पडले. खासदार स्मिता वाघ यांच्या पुढाकाराने आयोजित या प्रदर्शनाने जळगावकरांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विकास योजनांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी दिली.

तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाच्या सांगता सोहळ्यात महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “या प्रदर्शनाद्वारे स्मिताताईंनी केंद्र सरकारची सर्व खाती एका छताखाली आणली आहेत. शासनाच्या विकास योजनांचा प्रत्यक्ष अनुभव नागरिकांना मिळवून देण्याचे हे माध्यम ठरले,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

या वेळी आमदार राजूमामा भोळे, भाजपा संघटनमंत्री रवीजी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्षा भैरवी वाघ, गोदावरी शिक्षण संकुलाच्या अध्यक्षा केतकी पाटील, माजी जि.प. सदस्य राकेश पाटील, माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, अजित राणे, एलडीएम सुनील डोहरे तसेच फ्रेंड्ज एक्झिबिशनचे प्रोजेक्ट हेड अखिला श्रीनिवासन, विभागीय प्रमुख दत्ता थोरे आणि दीपकसिंग मेहता उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, “या तीन दिवसांच्या प्रदर्शनात अधिकारी आणि नागरिक यांच्यातील समन्वयाचे आदर्श उदाहरण घडले. शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचली. हे प्रदर्शन म्हणजे विकास आणि जनसंपर्क यांचा सुंदर संगम होता.”

सुट्टीचा दिवस असूनही या प्रदर्शनाला तिसऱ्या दिवशीही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, शाळा-काॅलेजचे विद्यार्थी, सरपंच-उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. तीन दिवसांत तब्बल १२ हजारांहून अधिक जळगावकरांनी प्रदर्शनाला भेट दिली.

प्रदर्शनातील सर्वोत्तम शासकीय स्टॉल्सना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सशस्त्र दलांसाठी मुनिशन्स इंडिया लिमिटेड, डिजिटल इनोव्हेशनमध्ये गुजरात इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड, वाहतूक आणि पायाभूत सुविधांमध्ये भारतीय रेल्वे, बँकिंग क्षेत्रात स्टेट बँक ऑफ इंडिया तर पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठी फलोत्पादन आणि वृक्षारोपण कॉर्पोरेशन विभाग – तमिळनाडू या विभागांना पुरस्कार देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्प स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या “ऑल इन वन रोबोटिक किट” प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला, केसीई अभियांत्रिकी कॉलेजला “मशीन पॉवर्ड बाय सोलर एनर्जी” प्रकल्पासाठी द्वितीय, तर पोदार इंटरनॅशनल स्कूलला “थ्रेट ऑफ ह्युमॅनिटी” या प्रकल्पासाठी तृतीय क्रमांक मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. प्रास्ताविक दत्ता थोरे यांनी केले, सूत्रसंचालन सरिता खोचणे यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपकसिंग मेहता यांनी मानले.

‘प्रगतिशील महाराष्ट्र 2025’ प्रदर्शनाच्या माध्यमातून जळगावकरांनी विकासाच्या झंझावाती प्रवासाचे साक्षीदार होत शासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचे नवे दालन खुलं झालं.


 

 

Tags: smitataini-kendra-sarkarchi sarv khati eka chatakhali aanli news
Previous Post

तीन नामांकित सुवर्णपेढ्यांना ‘लेडी स्नॅचर’चा गंडा; साडेचार लाखांचे दागिने लंपास!

Next Post

टायगर ग्रुपतर्फे जितेंद्र पाटील ‘आरोग्यदूत’ पुरस्काराने सन्मानित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
टायगर ग्रुपतर्फे जितेंद्र पाटील ‘आरोग्यदूत’ पुरस्काराने सन्मानित

टायगर ग्रुपतर्फे जितेंद्र पाटील 'आरोग्यदूत' पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon