वॉशिंग्टन (वृत्तसंस्था ) – सध्या जगातील व्यक्तींसाठी स्मार्टफोन अविभाज्य अंग बनले असून त्याच्या वापराविना आपण विचारच करू शकत नाही मात्र स्मार्टफोन नामशेष होणार असल्याचा दावा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे. त्यांच्या दाव्यात तथ्य असून स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

स्मार्टफोनची जागा इलेक्ट्रॉनिक टॅटू घेतील असे बिल गेट्स यांनी आपल्या दाव्यात म्हंटले आहे. स्मार्टफोनची सर्व कामे हा इलेक्ट्रॉनिक टॅटू करणार आहे.
इलेक्ट्रॉनिक टॅटू ही एक प्रकारची चिप आहे. ही चिप मानवी शरीरात सहजपणे बसवता येईल. ही चीप दिसायला टॅटूसारखी असणार आहे.
स्मार्टफोनची सर्व कामे हा इलेक्ट्रॉनिक टॅटू करणार आहे. इलेक्ट्रॉनिक टॅटू अर्थात चिप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हातात स्मार्टफोन घेण्याची गरजच पडणार नाही असे बिल गेट्स यांचे म्हणणे आहे.
बिल गेट्स यांचा हा दावा खरा ठरल्यास मोबाईल हातात घेऊन फिरावे लागणार नाही. ज्याप्रमाणे स्मार्टफोन काम करतो त्याच प्रमाणे ही इलेक्ट्रॉनिक चीप युजरला संपूर्ण जगाशी कनेक्ट करणार आहे. चिपसेट टॅटू 2030 पर्यंत थेट मानवी शरीरात समाविष्ट केले जाऊ शकतात.
यापूर्वी नोकियाचे सीईओ पेक्का लुंडमार्क यांनीही स्मार्टफोन हद्दपार होणार असल्याचा दावा केला होता. 2030 पर्यंत स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात अमूलाग्र बदल होणार आहेत.
स्मार्टफोनचा यूजर इंटरफेस, स्मार्ट चष्मा आणि इतर उपकरणे येणार आहेत. यामुळे मोबाईलचा वापर कमी होणार आहे.
सध्या स्मार्टवॉचमुळे मोबाईलचा वापर कमी झाला आहे. मसेज अलर्ट, कॉल अलर्ट यासह अनेक स्मार्टवॉच कॉलिंगची देखील सुविधा आहेत.








