• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्मार्ट फोन दुधारी तलवार – डॉ. सोमनाथ वडनेरे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 17, 2022
in खान्देश, जळगाव
0

रोटरीतर्फे `सायबर सुरक्षा : काल, आज आणि उद्या` व्याख्यान

जळगाव (प्रतिनिधी ) – आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. प्रमुख संपर्क साधन जरी असले तरी त्यातील अविवेकी वापरामुळे तो दुधारी तलवारीसारखा असल्याने वापरकर्ताच संकटात सापडण्याचे प्रमाणे सर्वाधिक आहे. असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.

रोटरी कल्ब, रोटरेक्ट क्लब आणि रोटरेक्ट क्लब आयएमआर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी हॉल, गणपती येथे `सायबर सुरक्षा : काल, आज आणि उद्या` विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी मुख्य विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष राजेश वेद, सचिव मनोज जोशी , समिती अध्यक्ष जयेश ठाकूर उपस्थित होते.

आपल्या संबोधनात डॉ. वडनेरे यांनी वर्तमान काळातील सायबर सुरक्षेच्या महत्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले त्यात स्मार्ट फोन, विविध ऑनलाईन पेमेंट साधने, सोशल मीडिया, नेट बँकिग सुरक्षा आदि मुद्यांचा समावेश होता.

स्मार्टफोन मित्र आणि शत्रूही :
आज प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनने महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे. घरगुती वापरकत्र्यांपासून विद्यार्थी, व्यावसायिक, विविध क्षेत्रातील सर्वच व्यक्तिं स्मार्ट फोन वापरतात. परंतु अलिकडे त्याच्या अतिविवेकी वापरामुळे अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहे.

सायबर सुरक्षाबाबत वर्तमानपत्र, सोशल मीडियात प्रबोधन होऊनही सायबर गुन्ह्यास बळी पडण्याचे प्रमाण जास्त असण्याचे कारण तंत्रस्नेही सर्वच बनलेत परंतु तंत्रज्ञान वापराचे जुजबी आणि विवेकी कौशल्य, जागरुकता समाजात येणे महत्वाचे आहे. सायबर गुन्ह्यात बळी पडण्याचे मुख्य कारण तंत्रज्ञान वापरणे पण तंत्र समजवून न घेणे हेच होय.

स्मार्टफोन वर `बाबूजी समजकर बोलना` ही म्हणण्याची वेळ आता आली आहे. पूर्वी दूरध्वनी विभागाकडेच कॉल रेकार्डिंग ही अधिकृत सुविधा होती. मात्र आता स्मार्ट फोन मध्येच ऑटो कॉल रेकॉर्डिंग ही सुविधा आल्यानंतर त्याचा स्वैर वापर होऊ लागला आहे. यामुळे एखाद्याला जीवनातून आयुष्यातून संपविणे पर्यंतच्या घटना यामुळे होऊ लागल्या आहेत. मुळात कॉल रेकॉर्डिंग आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंग या दोन्ही सवयी घातक असून आपला स्मार्टफोन हरविल्यास त्यातील कॉल रेकॉर्डिंगचा गैरउपयोग होऊ शकतो ही गंभीर बाब आहे.

वर्तमानपत्रातून आपण सायबर गुन्ह्यास बळी पडणा·यांच्या घटना वाचतो मात्र तरही सुशिक्षीत लोक यास जास्त बळी पडण्याचे कारण म्हणजे एक तर अलिलोभामुळे झटपट श्रीमंत होण्याचा कल आणि दुसरे म्हणजे तंत्रज्ञानास समजून न घेण्याची उदासिनता होय.

टेक्नो कौन्सीलरची मागणी वाढणार :
मानसिक स्वास्थ्यासाठी आज समुपदेशक अर्थात कौन्सीलरची मदत घेणा·यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र त्यापेक्षाही अधिक संख्या भविष्यात टेक्नो कौन्सिलर यांची लागणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साधनांनी मानसिक शांती, स्वास्थ्य हिरावून बसलेले शेकडो व्यक्ति आहेत त्यांना मार्गदर्शनासाठी ही संकल्पना वेगाने पुढे येत आहे.

या प्रसंगी रोटरी क्लब जळगाव, रोटरेक्ट क्लब जळगाव, रोटरेक्ट क्लब आयएमआर जळगावचे सदस्य आणि नागरीक उपस्थित होते. याप्रसंगी रोटरी बांधवानी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रम संचलन राजेश वेद यांनी तर आभार जयेश ठाकूर यांनी केले.


 

 

Tags: #rotryclub
Previous Post

शेंदुर्णी नगरपंचायतीतर्फे इंडियन स्वच्छता लीगला सुरुवात

Next Post

विद्यापीठात १५० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विद्यापीठात १५० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!
1xbet russia

हृदयद्रावक :  दाम्पत्याने एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन संपवलं, दोन्ही मुले झाली पोरकी..!

March 29, 2026
महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
1xbet russia

महापालिकेने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon