जळगाव ;- मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरु तुकाेबाराय साहित्य परिषदेच्या (महाराष्ट्र) उस्मानाबाद जिल्हा शाखेतर्फे भुसावळच्या शीतल जयेंद्र लेकुरवाळे यांना राजमाता जिजाऊ प्रशासकीय सेवारत्न पुरस्कार जाहीर झाला अाहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुका येथे उपअधीक्षक भूमिअभिलेख म्हणून शीतल लेकुरवाळे या सेवारत अाहेत. त्यांच्या सेवाकार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात अाला अाहे. परंडा येथील महात्मा गांधी विद्यालयात रविवारी (दि.१७) सकाळी ११ वाजता या पुरस्काराचे वितरण हाेणार अाहे. जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा जगद्गुरु तुकाेबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डाॅ. निर्मला पाटील, उस्मानाबाद मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तुषार पाटील, बालाजी जाधव, अॅड. तानाजी चाैधरी, नवनाथ जाधव, किरण निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार अाहे.








