धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील सोनवद बु .येथे सिंधुताई बहुउद्देशीय संस्था, म्हसावदतर्फे शिका व कमवा या उपक्रमानुसार सोनवद बु .॥ या गावातील बचत गटाला शिवणक्लास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. गावपातळीवर महिला उद्योजक तयार व्हावे या अनुशंगाने सोनवद बु .॥ येथील सरिता आकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवणक्लास प्रशिक्षण पुर्ण झाले.
तसेच संस्थेचे जिल्हा समन्वयक अनिल राठोड यांनी महिलांना मार्गदर्शन केले. संस्थेचे तालुका समन्वयक विशाल बडगुजर यांनी प्रशिक्षणस्थळी भेट दिली. त्यावेळी उपस्थित ट्रेनर चंद्रकला पाटील यांनी प्रशिक्षणार्थी संध्या झाल्टे, निकीता पाटील, आश्विनी पाटील, शितल पाटील, रुपाली पाटील, कल्याणी पाटील, संगीता पाटील, राजनंदिनी थोरात, दिव्या पाटील यांना ४० दिवसात घेतलेले प्रशिक्षण मध्ये फ्रॉक, टॉप, ड्रेस, चुडीदार पॅन्ट, साधे ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्स ब्लाऊज इ .खुप छान प्रकारे शिकविले. त्यांना चांगल्या प्रकारे रोजगार सुद्धा उपलब्ध झाला .तसेच संस्थेचे अध्यक्ष लखन कुमावत यांनी आभार मानले.