जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॉलनी आणि विसनजी नगरातून एकाच दिवशी दोन दुचाकींची चोरी झाली आहे. दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिल्या घटनेतील योगेश रमेश चौधरी (वय-३५ , रा. आसोदा ) हे फुल विक्रीचा व्यवसाय करतात. २२ ऑक्टोबररोजी संध्याकाळी त्यांनी विसनजी नगरातील गायत्री मंदीराजवळ (एमएच १९ बीटी ०८८९) क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये किंमतीची ही दुचाकी चोरून नेली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत सिंधी कॉलनी परिसरातील युनियन बँकसमोर संदीप बाळकृष्ण चौगुले (वय-३७ , रा. विवेकानंद नगर ) यांची एमएच ०९ एडब्ल्यू ३८३४ क्रमांकाची दुचाकी उभी होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.