भुसावळ शहरातील रजा टॉवर येथील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील रजा टॉवर येथील अंगारा ढाब्यावर जेवण केल्यानंतर बील मागण्यावरून कारणावरून हॉटेल मालकाला आणि त्याच्या पत्नी आणि मुलाला चाकू आणि तलवार दाखवून शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी १४ जून रोजी दुपारी ४.३० साडेचार वाजता घडली आहे. या संदर्भात रविवारी १५ जून रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन होलाराम सचदेव (वय-४०, रा. सिंधी कॉलनी भुसावळ) यांचे रजा टॉवरजवळ अंगारा नावाचे ढाबा आहे. शनिवारी १४ जून रोजी दुपारी ४.३० वाजता रोशन सचदेव हा दुकानावर असताना ग्राहकाला जेवणाची बिल मागितले. या रागातून संशयित आरोपी शेख नईम शेख सलीम, तसलीम उर्फ काल्या सलीम शेख, वसीम शेख सलीम शेख, शेख सलीम शेख सिकंदर, आशु बबलू ठोंबरे, आकाश अशोक लोंढे, आदिल खान शोएब खान, शेख वसीम उर्फ शेख चांद आणि आराम शेख वसीम (सर्व रा. भुसावळ) यांनी मिळून चाकू आणि तलवारीचा धाक दाखवून हॉटेल मालक रोशन सचदेव याला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांची पत्नी सोनी आणि मुलगा आदित्य यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली आहे.
दरम्यान या घटने संदर्भात रोशन सचदेव यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहे.