शेंदूर्णी (प्रतिनिधी) – शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाची चेअरमन संजय गरूड यांच्या आदेशान्वये व्हाईस चेअरमन वाय. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आलेली होती. या सभेमध्ये आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड यांचे जावई असलेले सतिशराव काशीद यांची सर्व संचालक मंडळाच्या संमतीने सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
सतिशराव काशीद यांची सचिवपदी नियुक्ती नंतर मावळते सचिन सागरमल जैन यांनी आचार्य बापूसाहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला व मला आजपर्यंत सेवा करण्याची संधी मिळाली याबद्दल समाधान व्यक्त केले. सतिशराव काशीद यांनी आपल्या नियुक्तीप्रसंगी बोलतांना संस्थेच्या प्रगतीचा जो रथ चेअरमन संजयराव गरूड यांनी सुरू केलेला आहे त्यात मी माझ्या अनुभवाची जोड देऊन सर्वांसोबत कार्यरत राहून संस्थेचे सर्व बाजूंनी नंदनवन करण्याचा प्रयत्न करील. सभेला सर्व सदस्य, आमंत्रित म्हणून चेअरमन प्रतिनिधी संजय देशमुख, सचिव प्रतिनिधी कैलास देशमुख, महेश गरूड हे हजर होते.