चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- बलवाडी ता.रावेर येथिल श्रृंगधाम आश्रमात देवतांची मोठ्या भक्तीभावाने जल्लोषात बलवाडी गावभर दिंडीसह सर्व मुर्त्यांची मिरवणुक काढून ३ जानेवारी रोजी स्थापन करण्यात आली. यावेळी आठ जोडप्यांनी पुजा होम हवन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
पुजेसाठी अभिजित महाराज खिर्डी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रा.प.स जितेंद्र महाजन व सरपंच वैशाली महाजन यांच्या जोडप्यासह सावदा येथिल महाराष्ट्र हरियाणा ट्रास्पोर्टचे संचालक राजकुमार व उर्मीला शर्मा, राजेद्र व अर्चना महाजन बलवाडी, हिरामण व सुनिता महाजन, पाडळसा, गोकुळ व सुरेखा महाजन, बलवाडी, भुषण व मोहिनी पाटील, भुसावळ, किरण व सुवर्णा महाजन वाघाडी, पिंटू व कविता भिल, बलवाडी या आठ जोडप्यांच्या हस्ते पुजन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी श्रृंगधामचे अध्यक्ष भागवत महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन श्रृंगधाम व कामधेनू गोमातेविषयी सखोल माहिती दिली.
येत्या २६ जानेवारी रोजी श्रृंगधाम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सालाबादप्रमाणे भव्य, दिव्य विशाल भंडाऱ्याचे आयोजन केले असून त्यासाठी सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. बलवाडी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष महाजन, उपसरपंच संजय भिल, निंभोरा महिला दक्षता समिती सदस्य आशाताई धनगर, संजय महाजन, गोपाळ सावंत महाजन विवरा, सुभाष महाजन, वसंत महाजन, लक्ष्मण महाजन, सिताराम महाजन, भास्कर धनगर, प्रा.दिलीप सोनवणे, देवेंद्र धनगर, युवराज महाजन, हर्षल साळुंखे, मोहित येवले, प्रकाश पाटील, चेतन महाजन, कृष्णा महाजन, भैया महाजन, वसंत महाजन आदि भाविक भक्त उपस्थित होते.