रावेर (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदारसंघातील मलकापूर येथे राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संतोष रायपुरे यांच्या कार्यालयास भेट दिली. महाविकास आघाडीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मला उमेदवारी जाहीर केल्याबद्दल सत्कार स्विकारुन चर्चा केली. तसेच तालुक्यातही श्रीराम पाटील यांनी मित्रपक्ष व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांचे पदाधिकाऱ्यांतर्फे स्वागत करण्यात आले.
रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार उद्योजक व समाजसेवक श्रीराम पाटील यांनी मतदारसंघात मित्र पक्षाच्या नेत्यांसोबत गाठी भेटी सुरू केल्या आहे. रावेर लोकसभा क्षेत्रात मलकापूर व नांदुरा मतदारसंघ आहे. याठिकाणी श्रीराम पाटील यांनी भेटी देऊन त्याच्यासोबत चर्चा केली. शरद पवार गटाकडून त्यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे मतदारसंघात चैतन्य निर्माण झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पदमराव पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विश्वास दर्शवत उमेदवारी जाहीर केल्याबद्दल श्रीराम पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आगामी रावेर लोकसभा निवडणूक नियोजनबाबत चर्चा करत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
अँड.रफिक शेठ यांची अल्पसंख्यांक विभाग रावेर लोकसभा मतदारसंघ प्रभारी पदावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले. नांदुरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव भोजने यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मलकापूर, वडनेर, निंबादेवी, टाकरखेडा गावातील कार्यकर्ते, प्रतिष्ठित मंडळी, ग्रामस्थ, बंधू आणि भगिनींशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जळगांव जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र भैया पाटील यांची भेट घेतली. आगामी रावेर लोकसभा निवडणूक नियोजन बाबत चर्चा केली.