लेवा एज्युकेशनल युनियन संचालित श्रीमती शांताबाई लक्ष्मणराव
जळगाव (प्रतिनिधी) – खडके प्राथमिक विद्या मंदिरात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी मुख्याध्यापिका अंजना सुरवाडे यांनी प्रतिमेचे पुजन केले. ऑनलाईन विदयार्थिनीना या महापुरुषांच्या कार्याची माहिती देण्यात आली या प्रसंगी इ.3 री व इ.४ थी च्या विदयार्थिनीना ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमासाठी उपशिक्षिका स्वाती फिरके, सायली नेमाडे, कैलास कुंभार व राकेश ब-हाटे उपस्थित होते.