जैन युवा रत्न पुरस्काराचेही होणार वितरण
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील श्री जैन युवा फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा रविवारी दि. २७ रोजी सकाळी १० वाजता आदित्य लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जैन युवा रत्न पुरस्काराने मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे.
श्री जैन युवा फाउंडेशन संस्थेची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात अध्यक्षपदी रितेश छोरिया, सचिवपदी ऋषभ शाह व कोषाध्यक्षपदी पंकज सुराणा ह्यांची निवड करण्यात आली आहे. श्री जैन युवा फाउंडेशन मागील ७ वर्षा पासुन सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यापार, सेवा अशा विविध क्षेत्रात काम करत आहे. ही जळगाव सकल जैन समाजची संस्था आहे. एका बैठकीत नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी रितेश छोरिया, सचिव ऋषभ शाह, कोषाध्यक्ष पंकज सुराणा, उपाध्यक्ष विनय गांधी, कार्याध्यक्ष अंकित जैन, सहसचिव अथांग पारख,सहकोषाध्यक्ष जिनेश सोगटी ह्यांची निवड करण्यात आली. हा पदग्रहण समारंभ २७ जुलै रोजी आदित्य लॉन्स येथे सकाळी १० वाजता होणार असुन त्या दिवशी “जैन युवा रत्न” पुरस्काराचे वितरण केले जाईल,असे पीआरओ प्रविण छाजेड ह्यांनी कळविले आहे.