जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थी यांना विशेष महत्त्वपूर्ण सुचना जाहीर करण्यात आली आहे. ज्यांना रुपये १५००/- प्रमाणे सदर योजनेचा लाभ मिळतो आहे, त्या सर्वांनी आपले अनुदान नियमित मिळाले पाहिजे.म्हणून आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करावे व आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करावे.
आधार हे बँक खात्याला लिंक करावे व अपडेट केलेले आधार कार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबर याबाबतची सर्व माहिती आपल्या गावातील तलाठी कोतवाल किंवा संगायो शाखा तहसील कार्यालय येथे आँनलाईन डीबीटी करण्यासाठी त्वरित आणून द्यावे. कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी डीबीटी केल्यावर शासनाच्या वतीने थेट अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती जामनेर येथील तहसीलदारांनी दिली आहे.