जळगाव (प्रतिनिधी) – शहराजवळच्या कुसुंबा येथे पतंग उडवत असताना १० वर्षांच्या मुलाला विजेच्या तारेचा शॉक लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली कुसुंबा गावांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हितेश ओंकार पाटील ( वय १३ , रा – कुसुंबा ) असे त्याचे नाव आहे शुक्रवारी तो मित्रांसोबत मैदानात पतंग उडवायला गेला होता पतंग उडवीत असताना विजेच्या तारांमध्ये अडकलेला पतंग ओढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला विजेच्या तारेचा शॉक लागला यावेळी ग्रामस्थांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्निल कळसकर यांनी त्यास मृत घोषित केले. डॉक्टरांनी या घटनेची माहिती एम आय डी सी पोलिसांना कळवली .