जळगावातील शनिपेठ येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शनिपेठ येथील २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता उघड झाली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगेश अनंत जाधव (वय २६, रा. शनिपेठ, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो शनिपेठेत आई, वडील, लहान भाऊ, बहीण यांच्यासह राहत होता. योगेश खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करीत होता. दरम्यान, शनिवारी योगेश घरीच होता. त्याचे वडील जेवणाचा डबा घेऊन कामावर जायला निघाले तेव्हा मुलगा योगेश याने घरातील खोलीत गळफास घेतलेला दिसून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.
कुटुंबीयांनी शेजारच्या नागरिकांच्या मदतीने योगेशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. रुग्णालयात नातेवाईक, मित्रांनी गर्दी केली होती. शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.