जळगाव (प्रतिनिधी) – गोविंदा रे गोपाला.. दहीहंडी फोड गोविंदा चा नामघोष.. प्रो लाईट अँड साऊंड शो रोषणाई तरुणींचे जल्लोषपूर्ण वातावरण… सोबत रोपमल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण… ३११ ढोल-ताशा वादकांचा एकाच वेळी गजर.. श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी यंदाचा तरुणींचा दहीहंडी महोत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडला. साहसी खेळांमध्ये तरुणींना प्रोत्साहन मिळावं यासाठी आयोजित तरुणींच्या दहीहंडी महोत्सवाचा दहीहंडी फोडण्याचा मान ही स्पर्धा न आयोजित करता सर्वांना आनंद मिळावा म्हणून यावेळेस सर्वांना देण्यात आला.


भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींचा दहिहंडी महोत्सवाप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित , कर्नल अभिजित महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, डॉ. भावना जैन, आशुली जैन, माजी महापौर जयश्री महाजन, विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ. अस्मिता पाटील, प्रतिभा शिंदे, पारस राका, अमर जैन,सुनील महाजन, शरद तायडे, स्वरूप लुंकड, डॉ कल्याणी गुट्टे-नागुलकर, प्रिती अग्रवाल, राजेश चोरडीया, सपन झुनझुनवाला, सचिन नारळे, गजानन मालपूरे व शहरातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहभागी दहिहंडी पथकांसमवेत ढोल पथकातिल कलावंत, रिल्स स्टार व नृत्य कलावंतांना घडविणारांचा चषक देऊन गौरविण्यात आले.







