प्रभाग ४ मध्ये शिवसेनेचे पियुष कोल्हे विजयी ; भाजपचे तिन्ही उमेदवारांची विजयाकडे वाटचाल


जळगाव प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुक मतमोजणीला सकाळपासून प्रारंभ झाला असून अनेक प्रभागांमध्ये भाजप सेनेचे उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहेत. प्रभाग ४ मधून शिवसेनेचे पियुष कोल्हे हे ९ हजार ५०० मतांनी आघाडीने विजयी झाले भाजपच्या शशीबाई ढंढोरे ,विद्या मुकुंद सोनावणे आणि कल्पेश कैलास सोनवणे हे देखील विजयी झाल्याची माहिती मिळत असून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. दरम्यान पियुष कोल्हे यांच्या विजयाने सरिता माळी या भावुक झाल्या होत्या.








