पारोळा(प्रतिनिधी) ;- आ. चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते चामुंडा सहकारी दुध उत्पादक संस्था. मर्यादित शिवरे दिगर ता.पारोळा या डेअरी शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी दुध उत्पादक शेतकऱ्यांना यापुर्वी गावापासुन ३ कि.मी. अंतरावर दुधाच्या विक्रीसाठी जावे लागत होते. आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या गावातच दुध विक्री करता येईल. त्यामुळे गावातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार मा.आबासाहेबांचे आभार मानले. याप्रसंगी मा.पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील, सावरखेडे मा.सरपंच राजेंद्र पाटील, शिवरे पोलीस पाटील तुकाराम पाटील, तरवाडे सरपंच सुमित राजपुत, म्हसवे ग्रा.पं.सदस्य साहेबराव पाटील, पारोळा दुध शितकरण केंद्राचे व्यवस्थापक प्रविण पाटील, विस्तार पर्यवेक्षक राजेंद्र पाटील, महेश ठाकरे, पांडुरंग माळी व आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.