जळगाव ( प्रतिनिधी ) – कोणतेही कारण नसतांना तिघांनी एका युवकावर तीक्ष्ण हत्याराने जखमी केल्याची घटना घडली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित संजय आकोलकर वय २१ असे जखमी युवकाचे नाव आहे. तो २७ सप्टेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शिवाजीनगरातील मारुती मंदिराजवळ उभा असतांना, बबलू हिरामन जोहरे ऊर्फ चॉपर बबल्या रा. हुडको शिवाजीनगर याच्यासह आणखी दोन जणांनी काही एक कारण नसतांना रोहित आकोलकर याला शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत एकाने रोहित याच्या कमरेखाली धारदार शस्त्राने वार करुन दुखापत केली.
याप्रकरणी दुसऱ्या दिवशी रोहित आकोलकर याने शहर पोलिसात तक्रार दिली. यावरुन बलू हिरामन जोहरे ऊर्फ चॉपर बबल्या रा. हुडको शिवाजीनगर याच्या यांच्यासहा इतर दोन जण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास महिला पोलीस नाईक वैशाली पावरा हे करीत आहेत.