जळगावात नूतन महाविद्यालयात बुधवारी आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : देशातील पहिले अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन, जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयात दि. २६ ते २९ जून दरम्यान होत आहे. या साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन आज दि. २४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी उद्योगपती रविंद्र लढ्ढा, संमेलनाच्या कार्याध्यक्ष तथा गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, डॉ. महेंद्र काबरा, नूतन मराठा महा विद्यालयाचे संचालक तथा प्रभारी मानद सचिव विरेंद्र भोईटे, इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्रचे रवींद्र पाटील, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल .पी. देशमुख, भारती साठे, डॉ.माधुरी पाटील,डॉ. के. बी. पाटील, उपप्राचार्य संजय पाटील, डी.एड कॉलेज च्या प्राचार्य एस. डी. सोनवणे, प्रा. आर.बी. देशमुख, प्रा. शिवराज पाटील, प्रा. राजेंद्र चव्हाण, प्रा. राजेंद्र देशमुख, स्वागत समिती सहसचिव विभाकर कुरंभट्टी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी या संमेलनासाठी आणलेली सुमारे ६ फुटापेक्षा अधिक उंचीची शिवराई, छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य टाक, भव्य वाघ नख आणि कार्यक्रम स्थळी सुरू असलेल्या तयारीची पाहणी उपस्थितांनी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांना डॉ.केतकी पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी च्या तयारीचा आढावा आणि चर्चा बैठकीत करण्यात आली