जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत शिष्वृत्ती मिळणेबाबत सर्व शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
सर्व शक्ती सेनेचे राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे आणि पदाधिकात्यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे कि , समाज कल्याण विभागाच्यावतीने महाराष्ट्रात विविध शाखामध्ये लाखो विदयार्थी शिक्षण घेत आहेत.प्रामुख्याने अनुसुचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, व ईतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाअंतर्गत शिष्यवृत्ती मिळते.गरीब, होतकरू , अल्पभूधारक विदयार्थी, शिक्षणासाठी शहरा मध्ये भाड्याने रूम घेऊन राहतात सर्वाना वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळते. दोन वर्ष झाले महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही.अनेक जाचक अटींमुळे विद्यार्थी वंचित आहे विद्यार्थी एक विषयात नापास झाला तरी त्याला येटीकेटीनुसार पुढील वर्गात प्रवेश मिळतो. परंतु त्याला स्वाधार योजनेचा लाभ मिळत नाही.
पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीची वार्षिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपये आहे मागासवर्गीयांना समाज कल्याण विभागाअंतर्गत शिष्यवृत्ती योजनेची अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे . ती वाढविण्यात यावी. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करूनही पुढे कार्यवाही झाली नाही शासनाकडे कोट्यवधी रुपये राखीव असून पण विद्यार्थ्यांना 2 वर्षापासुन लाभ मिळालेला नाही.
कोरोनामुळे महाराष्ट्रात हाहाकार असुन रोजगार पुर्णपणे बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर उपासमारीची वेळ आली आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना 8 दिवसात न मिळाल्यास महाराष्ट्राभर आदोलन छेडण्यात येईल. असा इशारा प्रा. संजय मोरे व जिल्हा अध्यक्ष कृष्णा सावळे यांनी या निवेदनात दिला आहे निवेदन देताना प्रा.संजय मोरे , कृष्णा सावळे , किरण निजाई , किरण वैद्य , लक्ष्मीबाई भोईर आदी उपस्थित होते.