जळगाव ( प्रतिनिधी ) – उच्च प्राथमिक शिषवृत्ती परीक्षेत कु. अनुष्का शिंपी जळगाव शहरात प्रथम क्रमांकाने तर जिल्हातील गुणवत्ता यादीत दहावी आली आहे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे संचलित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा १२ आँगस्टरोजी झाली. या शिषवृत्ती परीक्षेचा निकाल काल घोषित झाला. जळगाव येथील ओरीयन इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थीनी कु. अनुष्का संदीप शिंपी हिने शेकडा ८०.६६ टक्के गुण मिळवित जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक तर जळगाव शहराच्या गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. या यशाबद्दल कु .अनुष्काचे सर्वत्र कौतुक होत आहे. ती अडावद ( ता.चोपडा ) येथील रहिवाशी आणि भारतीय स्टेट बँक ( जळगाव ) येथे कार्यरत संदीप शिंपी आणि प्राथमिक शिक्षिका सौ.पुनम शिंपी यांची कन्या आहे .