शिरसोली (प्रतिनिधी) – येथील सेंट्रल बँक आँफ इंडीया शाखेत भरण्यात आलेली दहा हजारांची रक्कम रोखपाल मुकुंद ढेपे यानी प्रामाणिकपणे परत करुन पुन्हा एकदा विश्वासार्हता दाखवुन दीली आहे.या प्रामाणिकपणामुळे बँकेच्या सर्व टीमचे कौतुक केले जात आहे.
शिरसोली बँकेत उज्वला लक्ष्मण बारी याना त्यांच्या खात्यात तिन लाख रुपये भरणा करावयाचा होता. परंतु चुकुन त्यांनी तिन लाख दहा हजार रुपये भरणा केला हे रोखपाल मुकुंद ढेपे यांच्या लक्षात आले.त्यांनी सदर बाब व्यवस्थापक अमोल साळुंखे यांच्या लक्षात आणुन देवुन जास्तीचे आलेले दहा हजार रुपये उज्वला बारी याना परत केले. या मुळे त्यानी बँकेचे व्यवस्थापक अमोल साळुंखे, सोनल सोनवणे,लीपीक सुरेश गिरणारे, रोखपाल मुकुंद ढेपे, दत्ता बावीस्कर यांचे अभार मानले आहेत. या पुर्वीही त्यानी अनेक वेळा प्रामाणिकपणा दाखविलेला आहे.